चहाप्रमाणेच काहीजणांना कॉफीच व्यसन असतं. कॉफी पिल्यामुळे ताजेतवाने वाटत असल्याने ऑफीसात चार ते पाच कप कॉफी सहज प्यायली जाते. पण सतत कॉफीचे सेवन हे आरोग्यासाठी घातक ठरते.
१) कॉफीमध्ये कॅफीन असल्याने त्याचे अतिसेवन तुमच्या आरोग्याला घातक मानले जाते.
२) कॉफीचे अतिसेवनाने स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
३) जास्त कॉफी प्यायल्याने रक्तदाब कमी- जास्त होऊ शकतो.
४) सतत कॉफीचे सेवन केल्याने डोकेदुखी, भूक मंदावणे यांसारखे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात.
५) कॉफीच्या अतिसेवनाने शरीरातील हाडे कमकुवत होऊ शकतात.
६) कॉफीमुळे दातांवर डागही पडू शकतात.
७) कॉफीच्या अतिसेवनाने निद्रानाशही होऊ शकतो.
८) जास्त कॉफी प्यायल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो.
९) गर्भवती महिलांनी कॉफीचे सेवन अजिबात करू नये.
१०) जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने हार्टअटॅकचा धोकाही संभवू शकतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews